Pune PMC Property Tax | मिळकत करातील सवलतीचा कालावधी 15 जूनपर्यंत वाढविला; मिळकत कराची बिले वेळेत न पोहोचल्याने महापालिकेचा निर्णय

0

पुणे : Pune PMC Property Tax | मिळकत करात मिळणारी पाच ते दहा टक्के ही सवलत मिळविण्यासाठी पुणेकरांना आणखी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मिळकत कराची बिले वेळेवर मिळाली नसल्याने अनेक जण या सवलतीपासून वंचित राहणार होते. त्याची दखल घेत प्रशासनाने १५ जुनपर्यंत मुदत वाढविली आहे.

महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) मिळकत कर विभागाकडून मिळकतदारांना वेळेवर बिले मिळाली नसल्याने पाच ते दहा टक्क्याची सवलत मिळण्यापासून अनेकजण वंचित राहणार होती. यावर्षी महापालिकेने मिळकत कराची बिले पोस्टाद्वारे पाठविली आहे. तसेच महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या propertytax.punecorparation.org या संकेतस्थळावर बिले उपलब्ध करून दिली आहे. परंतु, पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेली मिळकत कराची बिले अद्याप मिळकतदारांना मिळाली नाही. संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक मिळकतदार हा बिल पाहू शकत नाही. तसेच अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याने संकेतस्थळावर माहीती मिळण्यात अडचणी येतात. याकारणांमुळे ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली गेली.

महापालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या मुदतीत (आर्थिक वर्षाच्या पहील्या दोन महिन्यात) मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. अनेक मिळकतदारांना बिले वेळेत मिळाली नसल्याने ते ही सवलत घेण्यापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात घेत प्रशासनाने पंधरा दिवस ही मुदत वाढविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.