Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : सोने खरेदीमध्ये ‘भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलर्स’ यांची पावणे दोन कोटींची फसवणूक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | सोने खरेदीचे पैसे पाठवल्यानंतर सोने न देता ‘भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलर्स’ (Bhamburdekar Saraf & Jewellers) यांची एक कोटी 87 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 27 ऑक्टोबर 2023 ते 30 मार्च 2024 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी (Indrayani Nagar Bhosari) येथे घडला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) मुंबईतील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विलास महादेव भांबुर्डेकर (वय-60 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भावेश संपतराज जैन (वय-43 रा. चिंचपोकळी स्टेशन ईस्ट समोर, मुंबई), म्रिनेस प्रितम जैन (वय-25 रा. शिवाजी पार्ख, कलबादेवी, मुंबई) यांच्या विरोधात आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीतील भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलेर्स यांनी बीएसजे बुलीयन मेटल हब एलएलपी कंपनी कडून वेळोवेळी सोने खरेदी केले. कंपनीच्या खात्यावर जमा असलेल्या पैशातून 30 मार्च 2024 रोजी 1 कोटी 16 लाख 44 हजार 150 रुपयांचे 6650 दराने 1700 ग्रॅम सोने खरेदी केले. तसेच 58 लाख 22 हजार 075 रुपये किमतीचे 850 ग्रॅम सोने खरेदी केले. फिर्यादी यांना सोने खरेदीचे बिल बनवून दिले. मात्र सोने न दिले नाही. त्यानंतर बिलात चूक असून दुरुस्ती करुन सोने पाठवतो असे फिर्यादी यांना सांगण्यात आले.

आरोपींनी सोने पाठवले नसल्याने फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी आता आम्ही गोल्ड एक्झीबीशनमध्ये आहोत असे म्हणत सोने व पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.