Protest Against Kalicharan Maharaj In Pune | ‘पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा’ ; पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

0

पुणे: Protest Against Kalicharan Maharaj In Pune | कालीचरण बाबाने केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) वतीने अभिनव कला महाविद्यालय चौक (Abhinav Kala Mahavidyalaya), टिळक रस्ता (Tilak Road Pune) येथे आंदोलन करून निषेध करण्यात आला.

बाबा कालीचरण याने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम महिलांचा अपमान केला आहे असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या” हे या भोंदू बाबाचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणं अत्यंत दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जात नाही. म्हणूनच या कालीचरणचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.” असे जगताप यांनी सांगितले.

यावेळी “पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा”, “समाजाला धोका, कालीचरणला ठोका” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, गणेश नलावडे, सारिका पारेख, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, तनया साळुंके, पायल चव्हाण, श्रद्धा जाधव, ऋतुजा देशमुख, मनीषा भोसले, दीपक जगताप, नितीन जाधव, ज्योतीताई सूर्यवंशी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.