Parvati Pune Crime News | पुणे : ‘चोरचोर’ म्हणून चिडवल्याने तरुणाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल

0

पुणे : – Parvati Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका तरुणाला ‘चोर चोर’ म्हणून चिडवल्याने तरुणाने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवरील पानमळा वसाहत (Panmala Vasahat Sinhagad Road) येथे घडली. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली आहे. मयत मुलाच्या घरच्यांनी पर्वती पोलिसांकडे तगादा लावल्यानंतर तीन महिन्यांनी (गुरुवारी दि.31 मे) चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

करण जाधव (वय 24, रा. पानमळा, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कार्तिक राजेंद्र हुलवाळ (वय 30, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, पुणे), निमिष वनराज महाडीक (वय 29, रा. यशलक्ष्मी निकेतन, पुणे), अक्षय हरिश्चंद्र उभे (वय 31, रा. समर्थनगर, सिंहगड रस्ता), प्रकाश जामू माने (वय 30, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता) यांच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी करणची आई नंदा कल्याणी जाधव यांनी गुरुवारी (दि.30) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश माने आणि करण यांच्यात आर्थिक व्यवहार होते. करण याने प्रकाश याच्याकडून पैसे घेऊन उभे याला दिले. मात्र, त्याने पैसे परत केले नाही. यामध्ये इतर आरोपी सामील होते. उभे पैसे देत नसल्याने करण याने त्याची दुचाकी ठेवून घेतली. दरम्यान, प्रकाश याने करणकडून दुचाकी घेऊन गेला. त्यानंतर करण याने सांगितलेल्या ठिकाणी गाडी लावून चावी करणकडे दिली. मात्र, त्याठिकाणी गाडी आढळून आली नाही.

करणने चैकशी केली असता माने याने गाडी परत केल्याचे सांगितले. त्यानंतर उभे यानेच गाडी नेल्याचे समोर आले. त्यामुळे संतापलेल्या माने याने करण याला ‘चोरचोर’ म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर आरोपी देखील करणला चिडवू लागले. त्यामुळे मानसीक त्रास होऊ लागल्याने करण याने घरातून बाहेर जाणे बंद केले. तो सतत तणावात होता. याच तणावातून करण याने 15 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील जगदाळे (PI Sunil Jagdale) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.