Manoj Jarange Patil At Pune Shivaji Nagar Court | मनोज जरांगे पाटील पुण्याच्या कोर्टात हजर, नेमकं काय आहे प्रकरण? (Video)

0

पुणे : – Manoj Jarange Patil At Pune Shivaji Nagar Court | मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे (Maratha Reservation Andolan) चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाने एका प्रकरणात वॉरंट (Warrant To Manoj Jarange) बजावला होता. त्यामुळे मनोज जरांगे आज (शुक्रवार) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले आहेत. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या (Cheating Fraud Case) गुन्ह्यात वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी जरांगे पाटील आज शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले.

पुणे सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मी न्यायालयाचा आदर करतो. न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टात जाण्याअगोदर दिली होती. जरांगे पाटील दुपारी बारा वाजता न्यायालयात पोहचले. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावल्यानंतर ते न्यायालयासमोर हजर झाले.

काय आहे प्रकरण?

जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे दिले नव्हते. याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कलम 156(3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावलं होते. त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.