Mangalwar Peth Pune Crime News | पुणे : चेष्टा मस्करीतून दोन मित्रांमध्ये वाद, धारदार तलवारीने वार; सराईत गुन्हेगाराला अटक

0

पुणे : – Mangalwar Peth Pune Crime News | चेष्टा मस्करीत एकमेकांना शिवीगाळ करत असताना त्याचे रुपांतर भांडणात झाले. यामध्ये एका तरुणावर तलवारी सारख्या धारदार लोखंडी हत्याराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 29 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार पेठ भागातील रोडवरील पुना एंटर प्रायजेस समोरील फूटपाथवर घडला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. (Stabbing Case)

याबाबत जखमी रोहित मुकेश चव्हाण (वय-19 रा. मंगळवार पेठ, पुणे) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मुस्तकीम ताजुद्दीन कुरेशी (वय-25 रा. कसबा पेठ, कागदीपुरा, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी कुरेशी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादी रोहित बुधवारी रात्री जेवण करुन पायी फिरण्यासाठी बाणेर रोडने जात होता. त्यावेळी आरोपी कुरेशी व त्याचे इतर दोन मित्र पुना एंटर प्रायझेस समोरील फुटपाथवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी रोहित त्यांच्याजवळ गेला. आरोपीने चेष्टेत रोहितला शिवीगाळ केली असता रोहितने देखील त्याला शिवीगाळ केली.

रोहित आरोपीला म्हणाला, असे त्या गरीब ट्रक ड्रायव्हरचा मोबाईल परत दे, गरिबाचा तळतळाट कशाला घेतो. याचा राग आल्याने कुरेशी याने रोहितला हाताने मारहाण केली. कुरेशी याने त्याच्याकडे असलेल्या तलवारी सारख्या धारदार लोखंडी हत्याराने रोहितच्या डोक्यावर व हातावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.