Hadapsar Pune Crime News | पुणे : जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

0

पुणे : – Hadapsar Pune Crime News | जन्मदात्या बापानेच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षापासून ते 26 मे दरम्यान घडला.

याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 40 वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह (Molestation Case) सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी तिच्या बेडरुममध्ये झोपलेली असताना आरोपीने तिच्या सोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी दचकून जागी झाली असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला. वडील असल्यामुळे पिडीत मुलीने याबाबत कोठेही वाच्चता केली नाही.

26 मे रोजी चतुर्थी असल्याने पिडीत मुलीचे आजी आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर येथे गेले होते. तर पिडीत मुलगी तिच्या आईच्या वडिलांकडे गेली होती. रात्री घरी आली आल्यावर पिडीत मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरुममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला. या प्रकारानंतर मुलीने नराधम बापाला धक्का देऊन पळून गेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.