Chhagan Bhujbal On BJP | ‘काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच’; भुजबळांनी भाजप नेत्यांना खडसावले

0

नाशिक: Chhagan Bhujbal On BJP | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election Maharashtra) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत (Mahayuti) आपणाला अधिक जागा मिळण्या संदर्भात मुंबईतील बैठकीत (Mumbai Meeting) भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) महायुतीत अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

छगन भुजबळ यांनी भाष्य करत विधानसभेला लोकसभेप्रमाणे खटपट होऊ नये असे म्हंटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी त्याबाबत भुजबळ यांच्यावर पलटवार केला होता.

” आमचे ५० ते ५४ आमदार आहेत. त्यातील दोन चार इकडे तिकडे गेले असतील. पण महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हाही त्यांनी आपल्याला ८०-९० जागा देण्याबाबत आश्वासन दिले गेले होते. आला लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Election 2024) जी काही खटपट झाली. ती पाहता पुढे अशी खटपट होता कामा नये.

आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना सांगितले पाहिजे. तेवढ्या जागा मिळाल्या तर त्यातून ५०-६० आमदार निवडून येतील. असे भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

” लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकांच्या अनुषंगाने होणारे जागावाटप मीडियाच्या माध्यमातून होत नसते. काही कारण नसताना यातून अडचणी , समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपाबाबत अजित पवार किंवा इतरांचे काही मत असेल तर गृहमंत्री अमित शाह , जे. पी नड्डा , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चा केली पाहिजे.

मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत असे म्हणणे गैर आहे. याबाबत तुम्हाला कोणी ठामपणे सांगितले याचा कोणताही पुरावा नसतो. तरीही सांगायचे असल्यास स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्याने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही.” असे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळ यांच्यावर पलटवार करत सांगितले होते.

जागावाटपाच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच’, असे भुजबळांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.

भुजबळ म्हणाले, ” मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचेही लोकांना वाईट वाटले. भुजबळ असं कसं बोलू शकतात, अशी ओरड त्यांनी केली. त्यामुळे मी आता प्रसारमाध्यमांसमोर बोलणार नाही. मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना ते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली. पण त्यावरुन तुम्ही चर्चा करता, चॅनलमध्ये बोलता, भुजबळांना समज द्या, असे बोलले जाते.

तुम्ही तुमच्या पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठे काय म्हणतो? तुमच्या पक्षात काय बोलावे हा तुमचा अधिकार आहे. तसेच मी माझ्या पक्षात काय बोलावे हा माझा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी मान्य केला पाहिजे. शेवटी निर्णय चर्चेतून होणार, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.