Mr & Mrs Mahi | ‘एमएस धोनी’ नंतर फ्लॉप झाले क्रिकेटवरील चित्रपट, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ कमाल करणार का?

0

नवी दिल्ली : Mr & Mrs Mahi | आयपीएल संपण्याची वाट पाहात असलेल्या बॉलीवुडने आता पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये गर्दी जमवण्यासाठी कंबर कसली आहे. जूनमध्ये बीग बजेट आणि मोठ्या स्टार्सचे चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या ३१ मे रोजी चित्रपटगृहात पदर्शित होईल.

राजकुमार आणि जान्हवी मागील काही दिवसांपासून आपल्या चित्रपटासाठी प्रमोशन करण्यात गुंतले आहेत. मिस्टर अँड मिसेस माहीच्या ट्रेलरवर तर जनतेचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता, पण चित्रपटाच्या कथेत असा विषय आहे, जो एका मोठ्या कालावधीपासून काही विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याचे नाव आहे – क्रिकेट.

क्रिकेटची क्रेझ पण क्रिकेटच्या चित्रपटांकडे पाठ

भारतात लोक क्रिकेटसाठी वेडे आहेत, पण क्रिकेटवरील चित्रपट हिट होण्याची गॅरंटी नसते. असे बॉलीवुड चित्रपट ज्यांच्या कथेत क्रिकेट आहे आणि ते हिट सुद्धा झालेत तर यामध्ये लगान (२००१) आणि एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी (२००६) वगळले तर अन्य कोणतीही नावे आठवत नाहीत.

श्रेयस तळपदेचा इकबाल (२००५) आवश्य एक सरप्राईज हिट होता आणि जन्नत (२००८) काही प्रमणात चांगला चित्रपट होता. पण या चित्रपटांशिवाय क्रिकेटवर बनविलेल्या चित्रपटांचे रिपोर्ट कार्ड खुप चांगले नव्हते.

सुशांत सिंह राजपूत स्टारर एम.एस. धोनी (MS Dhoni), १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवणारा मोठा हिट चित्रपट ठरला होता. पण त्यानंतर बॉलिवुडमध्ये क्रिकेटवरील एकही चित्रपट हिट ठरला नाही. २०१६ मध्ये आलेला ढिशूम आणि अजहर फ्लॉप झाले.

मागील काही वर्षांबाबत बोलायचे तर लॉकडाउनपूर्वी बरुन सोबतीचा २२याड्र्स (२०१९) आणि सोनम कपूर-दुलकर सलमानचा द जोया फॅक्टर (२०१९), क्रिकेट कनेक्शन असूनही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते.

लॉकडाऊननंतर आलेला, डायरेक्टर कबीर खानचा ड्रीम प्रोजेक्ट ८३ (२०२१) सुद्धा बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. रणवीर सिंहच्या या चित्रपटात पहिल्यांदा क्रिकेट विश्वकपची कथा दाखवूनही तो हिट होऊ शकला नाही. आता हे पहायचे की, राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा हा चित्रपट शुक्रवारी कोणती कमाला करणार.

Leave A Reply

Your email address will not be published.