Yogi Adityanath | ‘भाजपा 370 तर एनडीए 400 जागा पार करेल’ योगी आदित्यनाथ यांचा दावा

0

मुंबई: Yogi Adityanath | लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) सहा टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे तर ४ जून रोजी याबाबतची मतमोजणी असणार आहे. मात्र शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीच योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे.

योगी म्हणाले की , लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हाच भाजपा ३७० आणि एनडीए ४०० जागा पार करणार अशी घोषणा देण्यात आली होती. सध्या जनसामान्यांमध्ये ‘अब की बार ४०० पार” भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत योगी म्हणाले, ” मागच्या १० वर्षांमध्ये विकासाचे नवे मॉडेल मोदींच्या नेतृत्वाखाली समोर आलेले आहे. ४ जून रोजी निकाल लागेल तेव्हा भाजपा ३७० तर एनडीए ४०० जागा पार करेल” असे त्यांनी म्हंटले आहे. योगी पुढे म्हणाले की, ” काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी घटनेची सर्वाधिक खिल्ली उडवली आहे.

समाजवादी पक्षाने २०१२ च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामधून मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही बिहारमध्ये मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ घेण्याची घोषणा केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय बदलत राज्य सरकारला चपराक दिली आहे. तसेच धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे, असे योगी म्हणाले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगायचे की, धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये.

एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कापून त्यातील काही लाभ हा अल्पसंख्याकांना आणि विशेषकरून मुस्लिमांना देण्यासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले. काँग्रेसच्या आंध्र प्रदेश सरकार आणि कर्नाटक सरकारने ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांमध्ये वाटण्याचे काम केले आहे. असे योगी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.