Sushma Andhare On Dr Ajay Taware | ‘अजय तावरेंच्या जीवाला धोका’; सुषमा अंधारेंनी दिला आर्यन खान प्रकरणाचा हवाला

0

पुणे: Sushma Andhare On Dr Ajay Taware | पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात (Kalyani Nagar Accident) प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार (Swapping Blood Sample) केल्याप्रकरणी अटक केली.

पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोग्य विभागाने कशा प्रकारे भोंगळ कारभार केला हे चव्हाट्यावरले आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीचा अहवाल बदलला गेला. तीन लाखांमध्ये हे सर्व काही घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले.

अटकेत असलेल्या अजय तावरे याने माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हंटले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांच्या जीवाला धोका असू शकतो असे म्हंटले आहे.

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणाचे पुढे काय झाले, या प्रकरणामधील महत्त्वाचा साक्षीदार असलेला प्रभाकर साहिल याचा मृत्यू झाला. त्यानंतर ललित पाटीलही बोलले माझ्याकडे अनेक नावे आहेत पण पुढे चौकशीमध्ये काय बोलला काहीही समोर आले नाही.

आता पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये (Porsche Car Accident Pune) अटकेत असलेला आरोपी डॉ. अजय तावरे यानेही त्याप्रमाणेच वक्तव्य केले आहे. माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते.

कारण पोर्शे कार प्रकरणामध्ये मोठे प्रस्थ आहेत आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे अजय तावरेच्या जीविताला धोका होऊ शकतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिले, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडले हे सगळे तावरेंकडून समोर येऊ शकते, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी पुणे अपघात प्रकरणाचे खुलासे ४ जूननंतर करणार असल्याचा इशारा सुषमा अंधारेंनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.