Supriya Sule On Devendra Fadnavis | पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित; सुप्रिया सुळेंची टीका

0

पुणे: Supriya Sule On Devendra Fadnavis | कल्याणीनगर (Kalyani Nagar Accident) येथील पोर्शे कार अपघातात नवनवे खुलासे समोर येत आहेत (Pune Porsche Car Accident Case) . या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Pune Crime Branch). पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमदार धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रश्न उपस्थित करत पोलीस पैसे खाऊन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता या अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी एक्स वर पोस्ट करत गृह विभागाचे (Maharashtra Home Department) अपयश असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे एक्स वर पोस्ट म्हणाल्या, ”पुणे शहरात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याखेरीज आयटी उद्योगामुळे देशभरातील अभियंते येथे काम करीत आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकही पुण्याला आपली पसंती देतात. पुणे हे शहर कला आणि सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टीने देखील जगभरात प्रसिद्ध आहे. ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात आहे.

शहरात ड्रग्ज आणि गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे दिसते. येथे कोयता गँग आणि इतर गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरातील कायदे आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. स्वतः गृहमंत्र्यांना शहरात ठाण मांडून बसावे लागले ही बाबच परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यास तसेच शासन आणि गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यातील अपयश अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. यासोबत शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने अजून वेळ न घालवता शहराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गृहखात्याने येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पुर्वरत करण्यासाठी प्रयत्न करावे आणि नागरिकांना विश्वास द्यावा. हे सद्यस्थितीत अतिशय महत्वाचे आहे. ‘असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी (Pune CP) फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामध्ये बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास त्याला आरोपी करा समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.