Sanjay Jadhav On Shivsena UBT | महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील तर उद्धव ठाकरे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरतील

0

परभणी: Sanjay Jadhav On Shivsena UBT | लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतमोजणी ४ जून रोजी असणार आहे. मात्र त्यापूर्वीच महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून विविध आकडेवारी सांगत एवढ्या जागा मिळू शकतात असे दावे केले जात आहेत. तसेच हा निकाल येण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने जागा वाटपांबाबत नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत.

राज्यात महायुतीला माहित नाही मात्र महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील त्यात उद्धव ठाकरे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरतील असे वक्त्यव्य परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha) उमेदवार संजय जाधव यांनी केले आहे. तसेच राज्यात मराठा ओबीसी वाद भाजपाने लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

संजय जाधव म्हणाले , ” राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील मी आढावा घेतला तेव्हा यावेळची लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते असतील यांनी ज्यारितीने महाविकास आघाडी म्हणून प्रचार केला. त्यामुळे उद्याच्या ४ तारखेला या निकालाचा मॅन ऑफ द सिरिज कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. महायुतीच्या जागा किती असतील माहिती नाही. परंतु महाविकास आघाडी किमान ३५ जागा निवडून येईल हे मी आत्मविश्वासाने सांगतो असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ” ही पहिली निवडणूक होती जी विकासाच्या मुद्द्यावर न लढता ओबीसीविरुद्ध मराठा अशी लढली गेली. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर हेवेदावे संपायला हवे होते. निवडणुकीमुळे कटुता टोकाला जायची गरज नव्हती. ही लढाई वैचारिक असते. परंतु निवडणूक जातीवर गेली. भाजपाचे नेते, जे संवैधानिक पदावर आहेत त्यांच्यामुळे हे झाले. देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी ओबीसीतून येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, आमच्या पक्षाचा डिएनए ओबीसी आहे, त्यामुळे हे झाल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला आहे.

संजय जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षणाची गरज असल्याचे म्हंटले. मराठा समाजात आजही चूल पेटवायचे वांदे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.