Kondhwa Khurd Pune Crime News | पुणे : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी, खंडणी उकळणाऱ्यावर गुन्हा

0

पुणे : – Kondhwa khurd Pune Crime News | सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे फोटो (Photo Morphing) मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर (Obscene Photos On Social Media) अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर (Obscene Text) लिहिला. तसेच त्याच्याकडून 25 हजार रुपये खंडणी उकळून (Ransom) आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा (Extortion Case) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एका व्यक्तीवर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 14 एप्रिल 2024 ते 26 मे 2024 या कालावधीत कोंढवा खुर्द येथील आरोपीच्या घराजवळ आणि हॉटेल जश्न जवळ घडला आहे.

याबाबत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि.28) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मोहसिन सय्यद (रा. बोराडे नगर, वानवडी) याच्यावर आयपीसी 384, 506 सह आयटी अॅक्ट 67(ब), पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी सोबत ओळख करुन मैत्री करुन त्यांचा फोटो मॉर्फ केला. मॉर्फ केलेला अश्लील फोटो ग्रींन्डर अॅप व टेलिग्राम वर अपलोड केला. तसेच अश्लील फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून अश्लील मेसेज केला. आरोपीने फिर्यादी यांचा फोटो मित्रांना पाठवून फिर्यादी ‘गे’ असल्याचे सांगून बदनामी केली.

आरोपीने फिर्यादींना त्यांना धमकी देऊन 25 हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे आणखी दोन लाख रुपये खंडणी मागितली. तसेच ब्लिस बेकरीजवळ व त्याच्या राहत्या घराजवळ बोलावून घेत फिर्यादीला अश्लील स्पर्श करुन आक्षेपार्ह कृत्य करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.