Khadki Pune Crime News | पुणे : घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन, तरुणाला अटक

0

पुणे : – Khadki Pune Crime News | घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून असभ्य वर्तन करुन तिला धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.28) खडकी येथील मुळा रोडवर घडला दुपारी एकच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 16 वर्षाच्या पिडीत तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उदयराज अभंग उर्फ लड्डु
Udayraj Abhang alias Laddu (वय-19 रा. मुळा रोड, खडकी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 452, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलगी राहत असलेल्या घराच्या पाठीमागील खिडकीवर थाप मारली. त्यामुळे मुलगी खिडकीत कोण आहे हे पाहण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी दरवाजातून घरात आला.

आरोपीने घरात आल्यानंतर मुलीचा हात पकडला. तसेच आरडा ओरडा केला तर लक्षात ठेव असे म्हणून दम दिला. घाबरलेल्या मुलीने मदतीसाठी आई आणि भावाला आवाज दिला. मुलीचा आवाज ऐकून दोघे बाहेर आले असता आरोपीने पाठीमागील खिडकीतून उडी मारुन पळून गेला. याबाबत पिडीत तरुणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.