Dr. Pallavi Saple At Sassoon Hospital | तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशी कशी करणार? पल्लवी सापळे हसून म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा !

0

पुणे: Dr. Pallavi Saple At Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार (Swapping Blood Sample) केल्याप्रकरणी अटक केली.

या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

अशातच आता ससूनच्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे ही समितीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण, छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर सुधीर चौधरी समितीत आहेत. डॉ. पल्लवी सापळे या नेमलेल्या ‘एसआयटी’ समितीच्या अध्यक्ष आहेत. नियुक्तीनंतर प्रथमच पल्लवी सापळेंसह समितीचे सदस्य आज ससून रुग्णालयात दाखल झाले. या वेळी त्यांना विरोधकांच्या आरोपांविषयी विचारले असता त्या किंचित हसल्या आणि म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा.

पुढे पल्लवी सापळे म्हणाल्या, “पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मी आहे. कल्याणी नगरमधील अपघाताचा घटनाक्रम आम्ही घेऊन त्याबद्दलचा अहवाल शासनाला कळवू. शासनाच्या चौकशीचे निकष ठरलेत त्याप्रमाणे चौकशी करणार आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेची चौकशी होणार आहे. त्याच्या संबंधी असणाऱ्या सर्वांची चौकशी होईल.” असे सापळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.