ACB To Investigate Jarandeshwar Factory Scam | अजित पवारांना धक्का, जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची चौकशी सुरू, भाजपसोबत सत्तेत असातानाही हे कसं काय? चर्चेला उधाण

0

सातारा : ACB To Investigate Jarandeshwar Factory Scam | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) राज्याच्या लाचलुचपत विभाग म्हणजेच एसीबीकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपासोबत (BJP) राज्याच्या सत्तेत असतानाही हे कसे काय घडत आहे? यामागे नक्की कोणते राजकारण आहे? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

पुणे एसीबीकडून (Pune ACB) ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. साताऱ्यातील (Satara) जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात ही चौकशी सुरू आहे.

आधी ईडी व अन्य तपास यंत्रणांची नोटीस येते. नंतर, हा ससेमिरा मागे लागलेले नेते भाजपात जातात अथवा त्यांच्या सोबत जातात, त्यानंतर सर्व चौकशा थांबतात, असा आरोप विरोधी पक्षाचे नेते नेहमीच करत आले आहेत. मात्र, आता अजित पवारांच्या बाबतीत जे घडत आहे ते पाहता काहीतरी गडबड असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अजित पवार हे राज्याच्या सत्तेत सहभागी असताना आणि उपमुख्यमंत्री असतानाही जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने महायुतीत काही तरी गडबड असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार हे महायुतीपासून चार हात दूर राहात असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.

पूर्वी जरंडेश्वर कारखाना शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) चालवत होत्या. हा कारखाना तोट्यात गेल्यानंतर त्याचा लिलाव झाला. गुरू कमोडिटी या कंपनीने हा कारखाना लिलावात घेतला. परंतु ही कंपनी अजित पवारांशी संबंधित असल्याचे म्हटले गेले. नंतर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप करत शालिनीताई पाटील हायकोर्टात गेल्या, आणि कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर ईडीने चौकशी सुरू केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.