Prajwal Revanna | सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवण्णाने व्हिडीओ केला जारी; एसआयटी समोर हजर राहणार (Video)

0

कर्नाटक : Prajwal Revanna | जवळपास तीन हजार व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनतर प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी उघड झालेल्या या प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांच्या संयुक्त जनता दलाची प्रतिमा वादात सापडली होती.

https://x.com/HateDetectors/status/1795049965560967678?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1795049965560967678%7Ctwgr%5E813d2aa53840eb93411b3bec23322bd913bf4632%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fprajwal-revanna-sex-scandal-accused-jds-mp-viral-video-clip-assures-to-come-back-india-pmw-88-4395107%2F

जवळपास महिन्याभरापूर्वी हे प्रकरण उघड झाले. प्रज्वल रेवण्णाच्या ड्राइव्हरने या सर्व क्लिप असलेला पेनड्राइव्ह पोलिसांना दिला होता. त्यांनतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णा चा शोध सुरु केला. त्यांच्याबाबत लुकआऊट नोटीसाही काढण्यात आल्या आहेत.

त्यानंतर आता प्रज्वल रेवण्णा चा व्हिडिओ समोर आला आहे. बलात्काराचा आरोप असलेले निलंबित जनता दल (सेक्युलर) चे खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी आपण ३१ मे दिवशी सकाळी १० वाजता एसआयटी समोर हजर राहणार असल्याचे म्हंटले आहे.

रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी २६ एप्रिल रोजी पलायन केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र आज व्हिडिओ मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये आपला परदेश दौरा आधीच ठरला होता. मला ट्रीप वर असताना आरोपांची माहिती मिळाली आता आपण तपास यंत्रणेला मदत करण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.