Porsche Car Accident Pune | पोर्शे टीमने डेटा मिळवला; बिल्डर मुलाची कुंडली मिळणार…

0

पुणे : कल्याणीनगर भागात (दि. १९) घडलेल्या पोर्शे कार अपघातात (Porsche Car Accident Pune) दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला रक्ताचे नमुने (Blood Sample) घेण्यासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) सकाळी नऊच्या सुमारास नेण्यात आले. सकाळी ११ च्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले.

ससून रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह आल्यांनतर संशय बळावल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी १९ मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास औंध येथील रुग्णालयात रक्ताचे नमुने दिले. मात्र दोन्ही अहवालात पोलिसांना मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टर, एक शिपाई असे तिघांना अटक केली आहे तर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात आता पोर्शे ची टीम आरटीओ (RTO) सोबत कार ची तपासणी करीत आहे. बिल्डर विशाल अगरवालच्या (Builder Vishal Aggarwal) वकिलांनी पोर्शे कारमध्ये समस्या होती, असा दावा कोर्टात केला होता. याची तक्रारही कंपनीकडे केलेली आहे, असाही युक्तीवाद त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोर्शेची टीम पुण्यात आली आहे. यामुळे हा दावाही खरा की खोटा हे ठरविण्यास मदत मिळणार आहे. पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ या कारची तपासणी करत आहेत.

यामध्ये बिल्डर मुलाने अपघात केला तेव्हाचा कारचा असलेला वेग, वेळ, कितीवेळा कार हार्ड ब्रेकिंग करण्यात आली, कितीवेळा वेगाने चालविण्यात आली याचा डेटा या आरटीओला दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये इनबिल्ट डॅशकॅम होते. त्याचेही रेकॉर्डिंग मिळविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा वापर बिल्डर मुलाविरोधातील भक्कम पुराव्यांसाठी केला जाणार आहे.

अशी तपासणी याआधी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कंपनीकडून करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.