PCMC Water Supply | ‘या’ दिवशी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

0

पिंपरी :- PCMC Water Supply | निगडी से.क्र. 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणच्या जलवाहिनीतील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे गुरुवारी (दि.30) पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. ३१) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.