Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल

0

पुणे: Medha Kulkarni On Black Pub Owner | कल्याणीनगर भागातील अपघातात (Kalyani Nagar Accident) दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीचा एका दिवसात जामीन झाला. (Porsche Car Accident Pune)

यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीला घेऊन नागरिक प्रश्न उपस्थित करू लागल्यांनंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला. आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनीही हे प्रकरण पैसे खाऊन पोलीस दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

या प्रकरणात आता भाजपच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी लक्ष घातले आहे. शहरातील अनेक बेकायदा गोष्टींकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे म्हणत यामुळेच समाजाचे स्वास्थ्य बिघडले असल्याचे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे.

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेत झालेल्या अपघाताची माहिती घेतली. शहरातील अवैध बांधकामे,हॉटेल ,बार , पब यांच्या वेळेची अनियमितता , खाद्यपदार्थांचे स्टॉल्स त्यांच्या वेळा, पब , बार अधिकृत किती ? आणि अनधिकृत किती ? याची माहिती मिळावी आणि कारवाईचे वेळापत्रक मिळावे असे आयुक्तांना सुनावले.

तसेच त्यांनी ब्लॅक पब च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले ? असा सवालही उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.