PMC Notice To Bajaj Allianz House | अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजाज अलियान्झ हाऊसला पुणे महापालिकेची नोटीस

0

पुणे : – PMC Notice To Bajaj Allianz House | पुण्यातील विमानतळ रोडवरील (Airport Road Pune) बजाज अलियान्झ हाऊसला अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बांधकाम विकास विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग क्र.4 चे पदनिर्देशित अधिकारी तथा उप अभियंता योगेंद्र सोनवणे यांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच 15 दिवसात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

एअरपोर्ट रोड वरील व्हाईट हाऊस सोसायटी येरवडा येथे बजाज अलियान्झ हाऊसचा पाचवा आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. 300 चौरस क्षेत्रफळ असलेले हे बांधकाम करताना पूर्व परवानगी न घेता करण्यात आले आहे. बांधकाम करताना कोणतीही परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसी मध्ये संबंधितांना 15 दिवसात लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आला आहे. मुदतीमध्ये लेखी खुलासा केला नाही तर अनिधकृत बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात येईल. तसेच यासाठी येणारा खर्च संबंधिताकंडून वसुल केला जाईल, असे महापालिकेने दिलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.