Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ आला समोर, काय आहे व्हिडीओत? (Video)

0

पुणे : – Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरणातील (Pune Hit And Run Case) आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder In Pune) मुलाने दोघांना उडवल्यानंतर संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड केली होती. संतप्त नागरिकांनी कारच्या काचांवर दगड मारुन तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारवाईला वेग आला आहे. आरोपी मुलाच्या वडिलांपासून पब-बारचा मालकांना अटक केली आहे.

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत असताना कारने दोघांना उडवलं. भरधाव वेगात असलेल्या कारने दोघांना उडवलं. यामध्ये तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दोघांना उडवल्यानंतर अल्पवयीन कारचालकाने कार पुढे नेली. त्यानंतर नागरिकांनी या आरोपी मुलाला अडवलं. पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या भीषण अपघातानंतर नागरिकांनी पोर्शे कारची तोडफोड केली.

अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. कारच्या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सोशल मीडियावर दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

व्हिडीओत काय दिसत आहे?

रस्त्यावर आरोपीची पोर्श कार दिसत आहे. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या कारची नागरिक तोडफोड करताना दिसत आहे. या कारमध्ये कोणीही बसलेलं दिसत नाही. संतप्त नागरिक दगडाने कारची तोडफोड करताना दिसत आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारच्या काच दगडाने फोडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.