Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोत तरुणीचा अश्लील डान्स, इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडिओ, लोकांच्या संतप्त कमेंट

0

नवी दिल्ली : Delhi Metro Viral Video | सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून ते सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याची काही तरूण-तरूणींमध्ये चढाओढच लागली आहे. अनेकदा इच्छा नसतानाही आजुबाजुला असलेल्या लोकांना हे सर्व पहावे लागते. अशा इन्फ्लूएन्सरसाठी दिल्ली मेट्रो हे आवडते ठिकाण आहे. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एका तरूणीच्या अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र, युजर्स तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत.

https://twitter.com/DeepikaBhardwaj/status/1792116027662410061/video/1

रील्स, डान्स, गाणी हे सर्व ठीक असले; तरी या गोष्टी अश्लील पद्धतीने दाखवणे वाईट ठरत आहे. अशा गोष्टींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. या व्हायरल व्हिडीओतील इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सरने डान्स करताना अश्लीलतेचा कळस गाठला आहे. हा व्हिडिओ बनवताना आजुबाजूचे लोकही तोंड फिरवताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये क्रॉप टॉप आणि क्रॉप स्कर्ट घातलेली तरुणी कॅमेराकडे पाठ करून उभी राहते आणि त्यानंतर गाणे सुरू झाल्यावर ती पुढे जाऊन कॅमेराकडे पाहत डान्स सुरु करते. यात ती काही अत्यंत अश्लील स्टेप करताना दिसत आहे. ती खाली बसूनदेखील अश्लील डान्स करताना दिसत आहे. तर आजुबाजूचे लोक तिच्याकडे बघणे टाळत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ @Deepika Narayan Bhardwaj या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दिल्ली मेट्रोतील फ्री शो पाहा. या व्हायरल व्हिडीओवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.