CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | ‘कुणालाही पाठीशी घालू नका’ पुणे हिट अँड रन प्रकरणात CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

0

पुणे : – CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी एका आलिशान पोर्शे कारने दोघांना उडविले. यामध्ये तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला लगेच जामीन मिळाला. यामुळे पुणेकरांसह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही. तरी देखील पप्पांनी त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा

तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या आहेत. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले. याशिवाय, या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

पोलिसांच्या कारवाईला वेग

पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्यासह अल्पवयीन मुलांना बार व पबमध्ये दारु देणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुणे पोलिसांनी 24 तासात या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली. जी.एम. प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून त्याला अटक केली.

विशाल अग्रवालसह ड्रायव्हर चत्रभूज डोळस व राकेश पौडवाल यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.