Pimpri Chinchwad Police | पिंपरी : तक्रार निवारण दिनाच्या पहिल्या दिवशी 518 तक्रारींचा निपटारा

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Chaubey IPS) यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात महिन्यातील प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 19) झालेल्या पहिल्या तक्रार निवारण दिनी आयुक्तालयाच्या हद्दीत 518 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः निगडी (Nigdi Police Station) आणि पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) भेट देऊन या उपक्रमाचा आढावा घेतला.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस स्टेशन येथे शनिवारी सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत तक्रार निवारण दिनाचे पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले. सर्व पोलीस स्टेशन येथे एकूण अर्जदार 721 गैरअर्जदार 420 असे उपस्थित होते. त्यांच्या तक्रारी बाबतचे म्हणणे ऐकून तक्रारींचे निवारण करण्यात आले.

दरम्यान, एकूण 518 तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्वत: तक्रार निवारण दिनी निगडी पोलीस स्टेशन व पिंपरी पोलीस स्टेशन येथे अचानक भेट देऊन तक्रार निवारण दिनाचा आढावा घेतला. तसेच तक्रार निवारण दिन संबंधित पोलीस स्टेशन येथे घेण्यात येत आहेत की नाही याबाबत शहानिशा केली. स्वतः उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.