Uddhav Thackeray On Raj Thackeray | मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं, राज ठाकरेंना म्हणाले ”सुपारी बहाद्दरांवर…”

0

मुंबई : Uddhav Thackeray On Raj Thackeray | हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातोय. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन. सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातोय. पण, मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.

कालच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे (Mumbai South Central Lok Sabha) उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या प्रचारार्थ दादरमधील (Dadar) सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, वापरा आणि फेकून द्या, हे भाजपचे (BJP) नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी नकली आरएसएस असेही मोदी म्हणतील. नड्डांनी म्हटलंय की, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसे संघाला शंभर वरीस धोक्याचे आहे.

राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, इधर से, उधर से कल शिवाजी पार्क पर लेकर आये थे, सगळे भाडोत्री होते. ठाकरे नावाचा एक माणूस त्यांना पाहिजे होता, मग तोही त्यांनी भाडोत्री घेतला आहे. आता नको काय बोलायला, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील, अशा सुपारी बहाद्दरांवर नको बोलायला, असे ठाकरे म्हणाले.

मोदींच्या रोड शो वर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले, मोदी मुंबईला भिकारी करू पहात आहेत. घाटकोपर मध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळले. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींनी रोड शो केला. कशासाठी? सांत्वन करायला केले का हे? असे ठाकरे म्हणाले.

मोदी-शहांना खोचक टोला लगावताना ठाकरे म्हणाले, मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.