Prakash Ambedkar On Lok Sabha Result | प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा, ४ जूननंतर मोठा राजकीय भूकंप, उद्धव ठाकरे आणि शरद पवार…

0

मुंबई : Prakash Ambedkar On Lok Sabha Result | ४ जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवारही (Sharad Pawar) भाजपसोबत जाणार आहेत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पाचव्या टप्प्याच्या मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना आंबेडकर यांनी मोठा धमका केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अशाप्रकारचा दावा केल्याने याचे परिणाम मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबाबत असा दावा केला आहे. तसेच हा दावा करताना प्रकाश आंबेडकर यांनी कारणे देखील स्पष्ट केली आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला, शरद पवारही भाजपसोबत जातील. शरद पवार यांची काहीही गॅरंटी देता येत नाही. ते इथे राहतील याची गॅरंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील. दोघेही जातील. यात नवीन काहीच नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेले. त्यांचे काँग्रेससोबत (Congress) पटले नाही. त्यांना शरद पवार गटाचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यामागे जो ससेमिरा लावला आहे, त्यातून वाचायचे असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाणे भाग आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि मिसेस पवारही अजितदादांच्या कुटुंबीयांना भेटल्या. त्याही बातम्या होत्या. त्यामुळे सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटले असतील तर त्यात नवल नाही. निवडणुकीनंतरची कुटुंबातील ही नुरा कुस्ती कुठपर्यंत जाईल हे बघायचे राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.