Sinhagad Road Pune Crime News | पुणे : शोरुमच्या नावाने बनावट कागदपत्रे देऊन बँकेची 19 लाखांची फसवणूक

0

पुणे : – Sinhagad Road Pune Crime News | ऑटोमोबाईल्सच्या नावाने बनावट कागदपत्रे (Fake Documents) बनवून पुण्यातील बँकेला 19 लाख 70 हजारांचा गंडा घातला. हा प्रकार भारती सहकारी बँकेच्या (Bharti Sahakari Bank Vadgaon Branch) वडगाव शाखेत ऑक्टोबर 2021 ते 15 मे 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शाखा व्यवस्थापक विजय भगवान कदम (वय-48) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल संजय गायकवाड Amol Sanjay Gaikwad (रा. ओमेगा हेरिटेज, डी.एस.के. विश्व रोड, धायरी, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल गायकवाड याने चारचाकी इनोव्हा क्रिस्टा वाहनाच्या खरेदीकरिता भारती सहकारी बँकेच्या वडगाव-धायरी शाखेकडून 31 ऑक्टोबर 2023 रोजी 19 लाख 70 हजार रुपयांचे वाहन कर्ज घेतले. आरोपीने कर्जाची रक्कम व व्याजाची परतफेड केली नाही.

अमोल गायकवाड याने सोनक अॅटोमोबाईल्स प्रा. लि. नावाने आयसीआयसीआय बँकेत बनावट खाते उघडले. भारती सहकारी बँकेच्या वडगाव-धायरी शाखेकडून घेतलेले वाहन कर्जाची रक्कम 19 लाख 70 हजार रुपये बनावट सोनक ऑटोमोबाईल्सच्या बँक खात्यावर जमा करुन घेतले. आरोपीने स्वत:च्या आर्थिक फायद्या करीता पैशांचा अपहार करुन बँकेची फसवणूक केली. वाहन कर्जाच्या रक्कमेतून वाहन घेणे आवश्यक असताना आरोपीने वाहन खरेदी केले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.