Katraj Chowk Pune Crime News | कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

0

पुणे : – Katraj Chowk Pune Crime News | पुण्यातील कात्रज चौकात कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनरचे चाक दुचाकीस्वार तरुणाच्या पोटावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.16) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला. संतोष दिलीप तिखट (रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Accident In Katraj Chowk)

संतोष तिखट हा त्याच्या दुचाकीवरुन कात्रज बायपासवरुन देहूरोडला जात होता. त्यावेळी बारा चाकी कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये संतोष कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटावरुन चाक गेल्याने तो खाली कोसळला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस हवालदार प्रणव सपकाळ यांनी वॉर्डनच्या मदतीने संतोषला बाजूला घेतले. जखमीला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police) पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. कंटेनर चालक विठ्ठल बाबासाहेब गीते (वय-26 रा. मसोबावाडी, ता. आष्टी जि. बीड) याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.