Jejuri Pune Crime News | पुणे : दारुच्या नशेत डोक्यात विट घालून मित्राचा खून, दोघांना अटक

0

पुणे : – Jejuri Pune Crime News | ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेलेल्या मित्रांमध्ये पैशाच्या कारणावरुन वाद झाले. या वादातून तिघांनी मित्राच्या डोक्यात वीट आणि बाटली मारुन गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police Station) तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तर एकजण पळून गेला आहे. ही घटना जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्हे गावानजीक असलेल्या धाब्यावर घडली.

पवन संभाजी शेलार (वय 26, रा. काळदरी, ता. पुरंदर, जि .पुणे, सध्या रा. जेजुरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, विकास अर्जुन भोसले (रा. पिंगोरी), अविनाश आत्माराम पवार (रा. आडाची वाडी, वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांना अटक केली असून, तिसरा आरोपी तुषार शरद यादव (रा. पिंगोरी) हा पळून गेला आहे. (Murder In Jejuri)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी चौघेजण वाल्हेनजीक असणाऱ्या रामा या हॉटेलवर गेले होते. रात्री नऊच्या सुमारास दारुच्या नशेत पैशांच्या कारणांवरुन पवन शेलार व आरोपींमध्ये भांडण झाले. यावेळी तिघांनी पवन याच्या डोक्यात वीट व बाटलीने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी गंभीर अवस्थेत पवन याला सोडून निघून गेले.

पवन याला उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital Pune) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी (दि.15) रात्री त्याचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे, अशी माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे (API Deepak Wakchaure) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.