Rajesh Datar | प्रसिद्ध गायक राजेश दातार पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित

0

Rajesh Datar | प्रसिद्ध गायक राजेश दातार यांना पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते नुकताच पुण्यात देण्यात आला. गेल्या ३ दशकांपासून राजेश दातार हे गायक आणि संगीतकार म्हणून चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. दातार यांना या अगोदर उत्कृष्ट गायकीसाठी आकाशवाणीचा राष्ट्रीय पुरस्कार १९९१ साली मिळाला आहे. तसेच २०११ मध्ये  “समुंद्र” या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार मिळाला आहे. तर २०१२ साली चेन्नई येथे जेष्ठ संगीतकार मणी यांच्या हस्ते ‘भजन भूषण’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३ दशकांच्या भरीव कामगिरी बद्दल मॅगसेस अवॉर्ड विजेते, पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या नावाने दिलेला “राष्ट्रसेवा पुरस्कार” अतिशय महत्वाचा आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल दातार यांनी रसिक प्रेक्षकांचे, तसेच मणीभाई संस्थेचे आभार मानले आहेत. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते. काम करायला ऊर्जा मिळते. आगामी काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असे दातार म्हणाले.

देशात आणि विदेशात त्यांनी ३००० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम केले आहेत. तसेच अनेक टि.व्ही. चॅनेलवर तसेच एफ. टी. आय. आय. व आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांमधून आपली कला सादर केली आहे.  त्यातील  सुरताल, गीत गोपाळ, गीत रामायण, नक्षत्रांचे देणे, जीवन गाणे, माझे गाणे व सप्तसुर अशी आहेत. त्यांनी १५० हुन अधिक मराठी, हिंदी, भक्तीगीत, भावगीत व गैरफिल्मी अल्बमस् करिता गायन केले असून २० हुन अधिक मराठी चित्रपटांकरिता पार्श्वगायन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.