Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक (Video)

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यावसायिक स्पर्धेतून वाद झाल्याने एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकावर गोळीबार केला (Firing In Pimpri). यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला. ही घटना चिखली परिसरात जाधववाडी (Jadhavwadi Chikhali) येथे रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

अजय सुनील फुले (वय19, रा. मोहननगर, चिंचवड) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बन्सी सोनावणे (रा. जाधववाडी, चिखली), श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) आयपीसी 307, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्तीकुमार लिलारे याच्या मानेला लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अजय हा गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करतो. तसेच हर्षल सोनावणे याचा देखील गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून अजय आणि हर्षल यांच्यात स्पर्धा होती. या स्पर्धेतून त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होते. याचा राग मनात धरुन हर्षल सोनवणे याने शाम चौधरी व लिलारे यांच्यासोबत कट रचला. शाम आणि लिलारे यांनी अजय याच्या दुकानात येऊन वाद मिटवण्याच्या बहाण्याने पंतनगर येथे घेऊन गेले. त्याठिकाणी चर्चा सुरु असताना हर्षल त्याठिकाणी आला. त्याने पिस्टल काढून तीन गोळ्या अजय याच्यावर झाडल्या. त्यापैकी एक गोळी अजयच्या दंडाला लागली तर दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारे याच्या मानेला लागली. पोलिसांनी लिलारे याचा शोध घेतला असता तो मोरवाडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शाम चौधरी याला देहुरोड परिसरातून (Dehu Road) अटक केली.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे घटनेनंतर फरार झाला होता. त्याचा मोबाईल बंद असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. चिखली पोलीस त्याचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

पुणे शहर (Pune Lok Sabha), शिरुर (Shirur Lok Sabha) आणि मावळ लोकसभा मतदारसंघांच्या (Maval Lok Sabha) काही भागाचा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत समावेश आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. 13) मतदान प्रक्रिया पार पडणार होती. त्यातच मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. मात्र पोलीस तपासात कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणत्याच प्रकारे या घटनेचा संबंध नसल्याचे समोर आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे, सहाय्यक पोलीस फौजदार वडेकर, कडलग, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, संदीप मासाळ, विश्वास नाणेकर, चेतन राठोड, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरक्ष कुभांर पोलीस अंमलदार बोऱ्हाडे, जावळे, महाले, रुपनवर, जायभाये यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.