PM Modi Road Show In Mumbai | PM नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो; शक्तीप्रदर्शन करणार, अशी असेल वाहतूक व्यवस्था, घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा…

0

मुंबई : PM Modi Road Show In Mumbai | मुंबईतील सर्व लोकसभा मतदार संघातील (Mumbai Lok Sabha) महायुतीच्या उमेदवारांचा (Mahayuti Candidate) प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ मे आणि १७ मे रोजी मुंबईत येणार आहेत. मुंबईत नरेंद्र मोदी रोड शो करणार आहेत. यासाठी मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार असल्याने मुंबईकरांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ (DCP Raju Bhujbal) यांनी मोदींच्या कार्यक्रमादरम्यान वाहतुक कशी असेल याबाबत माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आता मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी ४-५ दिवसांचा अवधी उरला असून मुंबईत प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, रोड शो सर्वत्र होताना दिसत आहेत. उद्या नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत.

अशी असेल वाहतूक व्यवस्था

  • उद्या मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे दुपारी २ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत एल.बी.एस मार्ग बंद राहिल.
  • माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी. कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहिल.
  • मुंबई वाहतूक पोलिसांनी संपूर्ण एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्ग ला जोडणारा मुख्य रस्त्या पासून १०० मीटर अंतरापर्यंत १४ आणि १५ तारखेला नो पार्किंग केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.