Nashik Crime Branch | नाशिक : गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक (Video)

0

नाशिक : – Nashik Crime Branch | गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराला (Criminal On Police Record) नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आठ वर्षांनी अटक केली आहे. अजय शाम चव्हाण (वय-26 रा. श्रमीकनगर, जेलरोड, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर उपनगर पोलीस ठाण्यात 143, 147, 149, 427, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik IPS) , पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाल दिले होते. त्यानुसार पोलीस पेट्रोलींग करत असताना 2016 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी अजय चव्हाण हा जेलरोड परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीला उपनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक बाळु शेळके, पोलीस अंमलदार प्रकाश भालेराव, विलास गांगुर्डे, नितीन फुलमाळी यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.