Motor Accident Tribunal Pune | तरुणाच्या अपघात प्रकरणी इन्शुरन्स कंपनीला दणका, मृत तरुणाच्या कुटुंबीयांना 1 कोटी 40 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

0

पुणे : – Motor Accident Tribunal Pune | दुचाकीस्वार तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिले आहेत. मध्यस्थी यशस्वी समुपदेशन केल्याने दावा 14 महिन्यात निकाली निघाला.

पराग विजय कुलकर्णी असे अपघातात मृत्यू झालल्या तरुणाचे नाव आहे. 10 जानेवारी 2023 रोजी पराग त्यांच्या बुलेट गाडीवरुन बिबवेवाडी परिसरातून जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका भरधाव ट्रकने पराग यांच्या बुलेटला जोरात धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने पराग यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पराग यांची पत्नी स्नेहल, वडील विजय यांनी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (TATA AIG General Insurance) कंपनी विरोधात नुकसान भरपाईचा दावा मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दाखल केला होता. पराग एका नामांकित कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा 75 हजार रुपयांचे वेतन मिळत होते. त्यांच्यावर पत्नी, मुलगी आणि वडील अवलंबून होते. त्यामुळे दीड कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जे. जी. डोरल यांच्या न्यायालयात झाली. त्यानंतर दावा मध्यस्थीसाठी अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठवण्यात आला. अर्जदार आणि विमा कंपनीत यशस्वी तडजोड झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.