Bibvewadi Pune Crime News | पुणे: काम देण्याचे आमिष, चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबाडले

0

पुणे : Bibvewadi Pune Crime News | पुणे शहरात चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. बसमधून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरण्याच्या घटना घडत असताना चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबडण्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी भागात गुंगीचे औषध देऊन दोन महिलांचे दागिने चोरुन नले. आरोपी महिलेने दोन महिलांना काम मिळवून देण्याचे आमिष (Lure Of Work) देवून त्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लंपास केल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबत बिबवेवाडी येथील पापळ वस्ती (Papal Vasti Bibvewadi) परिसरात राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.18) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन एका अनोळखी महिलेवर आयपीसी 392, 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 जून रोजी दुपारी साडेबारा ते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भारत जोती बसस्टॉप, लक्ष्मी रोड (Laxmi Road Pune) आणि महिलेच्या राहत्या घरी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 12 जून रोजी बिबवेवाडीतील भारत ज्योती सोसायटी परिसरातून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निघाल्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एका महिलेने त्यांना अडवले. महिलेला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरुन लक्ष्मी रोड येथील घरी नेले. महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडील 83 हजार रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल फोन काढून घेतला.

अशाच प्रकार बिबवेवाडी भागातील आणखी एका महिलेकडील दागिने चोरुन नेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुंगीचे औषध देऊन दागिने चोरणाऱ्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे (API Pravin Kalukhe) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.