Hording Collapse Mumbai | मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत (Video)

0

मुंबई : Hording Collapse Mumbai | वादळी वाऱ्यामुळे मुंबईत घाटकोपर (Ghatkopar) येथे पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेटड्ढोल पंपाजवळील महाकाय लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. १४० बाय १४० चौरस फुटांचा हे होर्डिंग अचानक कोसळले आणि या खाली वाहने आणि शंभरहून अधिक लोक सापडले. दुर्घटनेत पीडितांची संख्या ८८ झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचे ते म्हणाले.

दुर्घटनेनंतर होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळताना व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. वादळवार आणि पाऊस अचानक सुरू झाल्याने अनेकजण पेटड्ढोल पंपाच्या परिसरात थांबले होते. त्याच वेळी हे महाकाय होर्डिंग क्षणार्धात कोसळले, आणि अनेक जण त्याच्याखाली सापडले. हे दृश्य अतिशय भीषण होते.

घटनास्थळी रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांच्या पथकांनी घटनास्थळी मतदकार्य सुरू केले होते. होर्डिंग लोखंडी असल्याने क्रेनशिवाय ते हटविणे अवघड होते, यामुळे मदतकार्य लवरक सुरू होऊ शकले नाही.

दरम्यान, दहा ते १२ किरकोळ जखमींना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, होर्डिंगखाली दबलेले लोक मदतीसाठी आरडा ओरड करत होते, हा आवाज हादरवून टाकणारा होता. घटनास्थळी दुर्घटना पाहण्यासाठी वाहने, नागरिक थांबू लागल्याने मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

फलक असलेली जागा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या (Mumbai Lohmarg Police) नावे आहे. फलक उभे करण्यासाठी आपण कार्यभार स्वीकारण्यापूर्वी परवानगी देण्यात आली होती, असा दावा लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS Ravindra Shisve) यांनी केला. फलकाला परवानगी कुणाच्या अखत्यारित देण्यात आली, याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.