Chhagan Bhujbal On Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला, म्हणाले ‘4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर…’

0

मुंबई : – Chhagan Bhujbal On Prithviraj Chavan | यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला (India Aghadi) देशभरात 240 ते 260 जागा मिळतील. भाजपाला तर बहुमताचा आकडा गाठणेही अवघड असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रात सत्ताबदल होण्याची शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य करताना 4 जूनला किती वेळ राहिला आहे, थोडा धीर धरायला काय हरकत आहे, असा सल्ला दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

छगन भुजबळ म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलेली आकडेवारी ही ज्योतिषा सारखी आहे. 4 जूनला किती वेळ राहिला आहे, थोडा धीर धरायला काय हरकत आहे, परिणाम व्हावा म्हणून अशी वक्तव्ये होत असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊतांनी केलेल्या पैशांच्या बॅगांवर आपल्याला काही माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले. तसेच मोदींच्या सभेचा आढवा घेण्याची आपलीही तयारी असल्याचे भुजबळ म्हणाले.

होर्डिंग दुर्घटना दुर्दैवी

काल मुंबईत होर्डिंग पडून झालेली घटना दुर्दैवी होती. एअर पोर्टकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात, हे होर्डिंग समांतर हवे होते. मात्र ते रस्त्यावर आहेत. त्याचे वजन सुद्धा भरपूर आहे. सगळे अनधिकृत आहेत. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. बेकायदेशीर आहे मग वेळ कशाला काढता? असा सवाल करत भुजबळ यांनी सगळ्याच संस्थांनी याची काळजी घेतली पाहिजे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय? शासन पाच लाख रुपये देईल, म्हणजे संपले का? असा सवाल करत भुजबळ यांनी जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा आकार त्या होर्डिंगचा होता, असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंचा काय संबंध?

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिडे आणि मातोश्रीचा संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार, नेत्यांनी केला होता. यावर भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा थेट सवाल करत भाजप नेत्यांचे आरोप खोडून काढले आहेत. सरकार आमचे आहे. महानगर पालिका आमचीच आहे. असे अनेक लोक असतात, व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात, यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही भुजबळ यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.