Rohit Pawar On Mahayuti | बारामतीत महायुतीने 150 कोटी खर्च केले, पण अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, महायुतीला एकूण…, रोहित पवारांनी वर्तविला अंदाज

0

नाशिक : Rohit Pawar On Mahayuti | देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) अंदाज राजकीय नेते तसेच राजकीय विश्लेषक वर्तवू लागले आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) किती जागर मिळणार? देशात सत्ता कोणाला मिळणार याबाबत हे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. आता कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज सांगितला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Nashik News)

रोहित पवार म्हणाले भाजपाला १३ ते १४ जागा, शिवसेना शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, एकूण महायुतीला १६ ते १८ जागा मिळतील.

रोहित पवार पुढे म्हणाले, महायुतीकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप सुरु आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी २ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी खर्च केले गेले.

रोहित पवार म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्तर हे भाजपच्या मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.