Sharad Pawar On BJP Modi Govt | मोदी सरकारवर शरद पवारांचा घणाघात, इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज? त्यांनाही सत्तेतून घालवू

0

पिंपरी : Sharad Pawar On BJP Modi Govt | बारामतीची लोकसभा निवडणुकीचे (Baramati Lok Sabha) मतदान झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणखी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये (PM Modi Nandurbar Sabha) केलेल्या वक्तव्यावरून देखील पवार यांनी रोखठोक सुनावले होते. तसेच अजित पवार यांच्यावर देखील कठोर भाषेत टीका केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची तुलना इंग्रज सरकारशी करत जोरदार घणाघात केला आहे.

शिरुर लोकसभेचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा हडपसर (Sharad Pawar Hadapsar Sabha) येथे झाली. यावेळी माजी आमदार महादेव बाबर (Former MLA Mahadev Babar), बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivarkar), प्रशांत जगताप (Prashant Jagtap), अंकुश काकडे (Ankush Kakade), निलेश मगर (Nilesh Magar) उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. विरोधात बोलणाऱ्यांना खोट्या केस टाकून तुरुंगात टाकले जाते. देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, भाजपला टीका सहन होत नाही. यामुळे ते खोट्या केस टाकून तुरुंगात टाकतात. दहा वर्षांत काय केले हे सांगण्यापेक्षा मोदी व्यक्तीगत हल्ले करतात. असत्यावर आधारित बोलतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख नसलेल्या गोष्टी मांडतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील असे सांगतात. सांगण्यासारखे काही नसल्याने असत्य प्रचार करत आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी टिंगलटवाळी करतात. गांधी कुटुंबाने देशासाठी योगदान दिले असून त्याच्या एक टक्का तरी मोदी यांनी योगदान दिले का, याचे उत्तर द्यावे. देशात गांधी-नेहरु यांचा विचार मजबूत केला पाहिजे असे विधान मी केले. त्यावर आमच्या पक्षात या म्हणत आहेत. ज्या पक्षात व्यक्तीगत स्वातंत्र्य नाही, देशाच्या ऐक्याच्या विचार नाही.

विचारधारेत समाजातील सर्व घटकांना आत्मविश्वास देण्याचा कार्यक्रम नाही. धर्मवादी विचाराचा पुरस्कार केला जातो, अशा पक्षाच्या आसपाससुद्धा मी, उद्धव ठाकरे आयुष्यात कधी उभे राहणार नाही. या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते केले जाईल, असे आव्हान शरद पवार यांनी दिले.

शरद पवार म्हणाले, देशातील निवडणुका एक, दोन ते जास्तीत-जास्त तीन दिवसात झाल्या. यंदा पहिल्यांदा सात टप्प्यात निवडणूक होत असून निवडणूक विभागाचा निर्णय संशय निर्माण करणारा आहे. ४० खासदार असलेल्या तामिळनाडूतील निवडणूक एका टप्प्यात आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांची निवडणूक सहा टप्प्यांत, हे कशासाठी, याचा अर्थ काय, लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका आहे. त्याला पुष्टी देण्याचे काम या निर्णयामुळे होत आहे, असा आरोप पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राज्यात आठ सभा घेतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण, आजपर्यंत हे कधी घडले नाही. आता का घडत आहे. एवढ्या सभा घेऊनसुद्धा हवा तो परिणाम दिसत नाही. शासनाचा जमाव घेऊन जात त्या माध्यमातून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील का याची खबरदारी घेणे हे सूत्र मोदी यांचे आहे, असे दिसते. त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

आमदार चेतन तुपे यांच्यावर टीकास्त्र डागताना शरद पवार म्हणाले, देशाच्या, राज्याच्या ऐक्यासाठी दिवंगत विठ्ठलराव तुपे हे नेहमी संघर्ष करायची तयारी करणारे होते. ते नेहमी जनसंघ, भाजपच्या विचारापासून दूर राहिले. त्यांची परंपरा दुसऱ्या पिढीने चालवावी, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने चेतन तुपे हे आमच्या पाठिंब्याने विजयी झाले. परंतु, सत्तेचा मलिदा मिळेल या हेतूने भाजपसोबत गेले. याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.