Pune News | पुण्यातील केरळवासीयांकडून काँग्रेस नेते रमेश चेन्नीथाला यांचा सत्कार

0

पुणे: Pune News | केरळ मधील व्यक्ती केवळ भारतातच नव्हे तर जगात कुठेही गेली तर अतिशय मेहेनत घेऊन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत राहतात ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. पुण्यातही मूळ केरळवासीय नागरिक येथील लोकजीवनाशी समरस झाले असून या निवडणुकीत संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी केरळवासीयांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे उमेदवार (Congress Candidate) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना विजयी करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रमेश चेन्नीथाला (Ramesh Chennithala) यांनी केले.

पुण्यातील मल्याळी नागरिकांच्या सुमारे ४५ संघटनांच्या प्रतिनिधींनी रमेश चेन्नीथाला यांचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पुणेरी पगडी व शाल देऊन त्यांचा गौरव केला गेला.

या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबू नायर म्हणाले महाराष्ट्रातील लोकांनी केरळ बांधवांसाठी अनेक प्रकारे सहकार्य केल्यामुळे समाज अनेक व्यवसाय अनेक संस्था उभा करू शकला म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचे आम्ही ऋणी आहोत.

याप्रसंगी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, राजन नायर यावेळी उपस्थित होते. या कार्याकामाचे स्वागत सदा वर्की यांनी केले. प्रास्ताविक बाबू नायर यांनी केले असून सूत्रसंचालन रवी एन. पी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.