Murlidhar Mohol | पुणे शहरातील राजस्थानी समाजाचा भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा

0

पुणे : – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) भाजप महायुतीचे उमेदवार (Mahayuti BjP Candidate) मुरलीधर मोहोळ यांना शहरातील विविध संघटना, संस्था आणि वेगवेगळ्या समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. शहरातील 27 हिंदु संघटनांनी यापूर्वीच मोहोळ यांना पाठिंबा जाहीर करुन मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. याच दरम्यान शहरातील विविध विधानसभा मतदार संघातून काढण्यात येत असलेल्या बाईक रॅली, प्रचार फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खासकरून बाई रॅलीमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहरातील राजस्थानी समाजाने (Rajasthani Samaj Pune) देखील मुरलधीर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राजस्थानी समाज मेळावा संपन्न झाला. यावेळी भजनलाल यांनी उपस्थित राजस्थानी बांधवांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभर साकारलेल्या विविध योजनांची कल्पना देऊन पुण्यातही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला सर्वच उपस्थितांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

जिथे जिथे मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास टाकला, तिथे तिथे विकासाची कामे चौपट वेगाने पुढे सरकली. राजस्थानमध्येही आम्ही तेच करत आहोत. महाराष्ट्रातही तेच आहे. कारण या सर्वांवर मोदी यांचे लक्ष आहे. म्हणूनच पुण्याचा अधिक विकास होण्यासाठी तुमचा माणूस थेट मोदींच्या ताफ्यात जाऊ द्या, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.