Pune Lok Sabha | पुणे लोकसभा मतदारसंघात 14 लाख मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण

पुणे : Pune Lok Sabha | चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणाऱ्या पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील वडगाव शेरी (Vadgaon Sheri Vidhan Sabha), शिवाजीनगर (Shivaji Nagar Vidhan Sabha), कोथरुड (Kothrud Vidhan Sabha), पर्वती (Parvati Vidhan Sabha), पुणे कॅन्टोंमेंट (Pune Cantonment Vidhan Sabha) व कसबा पेठ विधानसभा मतदार (Kasba Peth Vidhan Sabha) संघामध्ये २ हजार २१० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन १४ लाख ३ हजार ४६२ मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार १८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघात २० लाख ६१ हजार २७६ मतदार असून त्यापैकी वडगाव शेरी मतदार संघात सर्वाधिक ४ लाख ६७ हजार ६६९ मतदार आहेत. वडगाव शेरी मतदार संघातील ३ लाख ६४ हजार ९४६ मतदार ओळख चिठ्ठ्यांचे ४५३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन ७८ टक्के वितरण करण्यात आले आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ५४४, कोथरुड विधानसभा मतदार संघात २ लाख ६८ हजार ३४७, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात १ लाख ८८ हजार २७०, पर्वती विधानसभा मतदार संघात १ लाख ८३ हजार ६७७ तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघात २ लाख २५ हजार ६७८ मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले.
मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक किमान सुविधा करण्यात आल्या असून मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातील आदर्श व महिला संचलित मतदान केंद्र
पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत वडगावशेरी मतदार संघात कै. तुकाराम धोंडीराम पठारे प्राथमिक विद्यालय, शारदाबाई पवार इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये, आय टी पार्क, खराडी खोली क्रमांक १, शिवाजीनगर मतदार संघात आय टी आय, औंध, कोथरुड मतदार संघात सीएम इंटरनॅशनल स्कूल एस के पी कॅम्पस, बाणेर, बालेवाडी खोली क्रमांक १०, पर्वती मतदार संघात प्रगती विद्यालय हिंगणे खुर्द, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात अल्पबचत भवन क्वीन्स गार्डन पुणे, कसबा पेठ मतदार संघात टिळक आयुर्वेदिक विद्यालय, रास्ता पेठ पश्चिमेकडील इमारत, तळमजला खोली क्रमांक ३ याठिकाणी आदर्श मतदान केंद्र असणार आहेत.
वडगावशेरी मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक ३४९ सेंट अर्नाल्ड सेंट्रल स्कूल, वडगावशेरी, तळमजला खोली क्र.१, शिवाजीनगर मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक १९१ विद्याभवन ज्युनिअर कॉलेज, मॉडेल कॉलनी, खोली क्र.१, कोथरूड मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक ३५८ कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, कर्वे नगर, खोली क्र.१, पर्वती मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक ६८, मनपा शाळा क्र.८०/बी सरिता नगरी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक १४०,
महात्मा जोतिबा फुले गर्ल्स स्कूल, नाना पेठ, कसबा पेठ मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक ८७, धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्या मंदिर, शाळा क्र. १७/४९, तळमजला खोली क्र.२, शास्त्री रोड, नवी पेठ हे मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र असणार आहेत.