Devendra Fadnavis Pune Sabha | पुणेकरांनो, मुरलीधर मोहोळांना निवडूण द्या, म्हणजे मोदींच्या इंजिनाला आणखी बोगी लागेल, विकासाकडे ही गाडी वेगाने धावेल – देवेंद्र फडणवीस

0

पुणे : Devendra Fadnavis Pune Sabha | एकीकडे पांडवांची सेना आहे, जिचे नेतृत्व विश्वगुरू मोदीजी (PM Narendra Modi) करत आहेत, त्यांच्यासोबत शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shvisena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP), राज ठाकरेंची मनसे (Raj Thackeray MNS), जनसुराज्य, शिवसंग्राम पक्ष, लहुजी संघटना अशा अनेक संघटना आहेत. या सर्व संघटना मिळून ही महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि २४ पक्षांची खिचडी आहे. आपलं ठरलं आहे मोदीजी पंतप्रधान होणार. पण त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी नेताच नाही, अशी जोरदार टीका भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आज सायंकाळी पुण्यात गोखले नगर (Gokhale Nagar) येथे महायुतीचे भाजपाचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र डागताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, रोज सकाळी टीव्हीवर एक पोपट येतो, त्याला विचारले तर तो म्हणतो पाच वर्षात पाच पंतप्रधान करू. म्हणजे हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील. राहुल गांधी, स्टॅलिन, केजरीवाल खुर्चीभोवती धावतील. जो बसला तो पंतप्रधान. यांना सांगितले पाहिजे की ही कुटुंबाची नाही, १४० कोटीच्या देशाचा प्रमुख निवडण्याची निवडणूक आहे.

इंडिया आघाडीवर (India Aghadi) टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांचे २४ पक्ष खेळखंडोबा करत आहेत. यांना निती नाही. आपली महायुती विकासाच्या गाडीसारखी आहे. मोदीजी या गाडीचे इंजिन आहे. वगवेगळे पक्ष डब्बे आहेत. आदिवासी, ओबीसी, दलित, भटके, सर्वांसाठी या गाडीत जागा आहे. सर्वांना घेऊन हे इंजिन विकासाकडे घेऊन जाते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राहुल गांधीकडे सर्व इंजिनच आहेत. डब्बे नाहीत. सर्वजण म्हणत मी इंजिन, लालुंचा मुलगा म्हणतो मी इंजिन, केजरीवाल म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणतात मी इंजिन, पवार (Sharad Pawar) म्हणतात मी इंजिन, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन, ममता म्हणतात, मी इंजिन आहे. पण राहुल गांधींच्या इंजिनमध्ये केवळ सोनिया आणि प्रियंकासाठी जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये केवळ आदित्यसाठी जागा आहे. तर शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ त्यांच्या कन्येसाठी जागा आहे, पण तुमच्यासाठी जागा नाही.

म्हणून मी म्हणतो, मुरलीधर महोळ यांना निवडूण द्या, म्हणजे मोदींच्या इंजिनाला आणखी एक बोगी लागेल, आणि विकासाकडे ही गाडी वेगाने धावेल, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुरलीधर मोहोळ पुण्याच्या महापौर पदापर्यंत पोहोचले, आता खासदार बनणार आहेत. कोविड काळात चांगले नेते घरी असताना त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. या पुण्याचे चित्र सहा वर्षात मोदींनी बदलले. मेट्रो आली, विमानतळ झाले, नदी प्रकल्प आला, २० हजार घरे बांधली, अनेक योजना होत आहेत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होईल असे पुणे तयार होत आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजींनी एक चमत्कार केला, २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढले. २० कोटी गरिबांना पक्क्या घरात आणले, ५५ कोटी गरीबांना शौचालय दिले, ६० कोटी गरीबांना नळ दिले, ८० कोटी गरिबांना मोफत रेशन दिले. हे काम मोदीजींनी केले. ६४ कोटी लोकांना मुद्रा अंतर्गत कर्ज दिले. पूर्वी गॅरंटी मागितली जात होती. या सर्वांची गॅरंटी मोदीजींनी घेतली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता २० लाखापर्यंत कर्ज मोदीजी देणार आहेत. बचत गटाची योजना सुरू केली आहे. देशात ८० लाख बचत गट तयार केले. १० कोटी महिलांना कामाला लावले. ७० लाख, महिला महाराष्ट्रात बचत गटात कामाला लागल्या.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, १० कोटी महिला लखपती होणार आहेत. दलित समाजासाठी योजना आणली, यामुळे देशात लाखो उद्योजक तयार झाले. आदिवासी समाजासाठी २४ हजार कोटीची योजना आणली. ज्यांचा विचार कोणीच केला नव्हता, त्या बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना आणली, त्यासाठी १४ हजार कोटी दिले. व्यवसायासासाठी प्रशिक्षणासाठी हे पैसे दिले. त्यांचे उद्योग ग्लोबल करण्यासाठी पैसे दिले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मोदी सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करतात, आयुष्यमान योजनेतून कोट्यवधी लोकांना मदत मिळाली. ७० वर्षावरील सर्व लोकांना सर्व वैद्यकीय खर्च मोफत केला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली, याद्वारे मोदी सरकार सोलर बसवते, यातून ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळते, वीज विकता येते.

ही निवडणूक देशाचा नेता निवडणार आहे. कोणत्या नेत्याकडे इतकं व्हिजन आहे का. ६० वर्ष काँग्रेसचे सरकार, पण गरिबी हटली नाही. त्यांनी स्वताची गरिबी हटवली. मोदीजींनी देशात भ्रष्टाचार संपवला. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली, आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणणार आहेत, असे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थव्यवस्थेतून रोजगार, पयाभूत सुविधा मिळतात, गरिबी दूर होते, देश मजबूत होतो, मोदींच्या नेतृत्वात देश मजबूत होत आहे. कोविडमध्ये भीषण स्थितीत सुद्धा मोदींनी काम केले. मोदींनी भारतीतील शास्त्रज्ञ एकत्र करून लस तयार करून घेतली. १४० कोटी लोकांना विनामुल्य लस दिली. आपण जिवंत आहोत, कारण मोदींनी आपल्याला लस दिली. मॉरिशसमध्येसुद्धा आपण लस पुरवली. मॉरिशसच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मोदींचे नेतृत्व वैश्विक आहे. मुरलीधर मोहोळ देखील जनतेची सेवा करतात. पवार साहेब म्हणाले, चार जूननंतर प्रदेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पक्ष रसातळाला गेल्यावर चारवेळा ते काँगे्रसमध्ये गेले. ते आता असं बोलतायत म्हणजे त्यांचा पक्ष रसातळाला गेला आहे.

या वेळचे मतदान भाजपासाठी नाही तर भारतासाठी आहे. येत्या १३ तारखेला मुरलीधर मोहोळ यांना मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी शेवटी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.