CM Eknath Shinde On Sharad Pawar | पवारांनी मोदींवर केलेल्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्याचे प्रत्युत्तर, 10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही…

0

पुणे : CM Eknath Shinde On Sharad Pawar | इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. मात्र १० वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही मागे टाकणारे आपले मोदी (PM Narendra Modi) आहेत. त्यांना रोखठेक उत्तरे देणारे आपले मोदी आहेत. पाकिस्तानला धडा शिकवणारे आहेत. आपल्या सैनिकांचे मुंडके छाटण्याची हिंमत पाकिस्तानी दहशतवादी करत होते. आता तशी हिंमत कोणाची होत नाही. आता मजबूर भारत नाही, तर मजबूत भारत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मोदींवरील टीकेचा समाचार घेतला.

शरद पवार यांनी म्हटले होते की, देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा घणाघात शरद पवार यांनी केला होता.

मावळमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडला (Eknath Shinde Road Show In Maval). यावेळी त्यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. (Maval Lok Sabha)

मुख्यमंत्री म्हणाले, देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर राहुल गांधी (Rahul Gandhi) आहेत. एकीकडे देशभक्त तर दुसरीकडे देशद्रोह दिसत आहे. कारण पाकिस्तानची बोली आता बोलू लागले आहेत. निवडणुकांमध्ये पराभव होणार आहे त्यामुळे त्यांच्या पाय़ाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे मागे ठेवून नवे मुद्दे आणत आहेत. मात्र जनतेने ठरवले आहे की फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.