Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’चे औचित्य साधून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) ३० सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत असतात. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. अभिजित सोनावणे (Dr. Abhijit Sonawane) आणि डॉ. मनिषा सोनावणे (Dr. Manisha Sonawane) यांनाही ट्रस्टच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. सोनावणे हे रस्त्यावरील भिक्षेकरी आणि अनाथ लोकांवर आजारी पडल्यावर मोफत उपचार करतात, तसेच त्यांना छोट्या व्यवसायासाठीही मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करतात.

महापालिकेच्या सफाई कामगार विभागातील वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बडगर व गाडगीळ शाळा मुकादम लक्ष्मण चव्हाण यांनी सफाई कामगारांचा सत्कार केल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. याप्रसंगी जिजामाता आरोग्य कोठी कामगार मुकादम यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘‘नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचं मोठ काम सफाई कर्मचारी वर्षभर अव्याहतपणे करत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळणं, हा एक प्रकारे ट्रस्ट्रचा सन्मानच आहे. शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगार हा महत्त्वाचा घटक असल्याने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ नेहमीच या कर्मचाऱ्यांसोबत राहील.’’

पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
Punit Balan (Festival Head and Trustee, Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust)

Leave A Reply

Your email address will not be published.