Viman Nagar Pune Crime | पुणे : मुलाने अंगठी चोरल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

0

पुणे : – Viman Nagar Pune Crime | दोन लहान मुलांवर सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ घेतल्याचा जाब विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन महिलेसोबत वाद घातला. तसेच एका महिलेला धक्काबुक्की करत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना विमानतळ परिसरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.1) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 38 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गौतम सावंत व त्याच्या पत्नीवर (रा. विमाननगर) यांच्यावर आयपीसी 354(अ) 323. 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आठ वर्षाचा मुलगा व भावाची 14 वर्षाची मुलगी यांनी सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ आरोपींनी घेतला.

याबाबत फिर्यादी व त्यांची बहिण आरोपींना विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत भांडण करुन दोघींना शिवीगाळ केली. आरोपी गौतम याने तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुमच्याच मुलांनी सोन्याची अंगठी चोरील आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला धक्काबुक्की करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करत तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मेढे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.