Murlidhar Mohol | पुणे शहर पद्मशाली समाजाचा महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर

0

पुणे : – Murlidhar Mohol | पद्मशाली समाज पुणे शहर (Padmashali Samaj Pune) यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेचे भाजप महायुतीचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा देण्यात आला आहे. आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या उपस्थितीत पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर केला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील (Pune Cantonment Vidhan Sabha) कामगार मैदान येथे पुणे शहर पद्मशाली समाजाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी पद्मशाली समाजाचे आभार मानले. मुरलीधर मोहोळ यांना शहरातील अनेक संघटना व विविध समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.

याप्रसंगी आमदार सुनील कांबळे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, स्थानिक नगरसेवक, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोड्डू आणि समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.