Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime | अमेझॉन कंपनीकडून बेंगलोर येथील गोडावून मधून लॅपटॉप, इलेक्ट्रीक वस्तु व इतर महागड्या इलेक्ट्रीक वस्तू एक्सपोर्ट करत असताना कंटेनर चालकाने 48 लाखांच्या वस्तू लंपास केल्या (Embezzlement Case). याप्रकरणी कंटेनर चालकावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय-25 रा. अजमेरा एक्साटीक समोर, वाघोली मुळ रा. खरहार तिवारी, जि. मिर्झापूर उत्तर प्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून कंटेनर चालक शाहिद इलियास (वय-25 रा. राजस्थाान) याच्यावर आयपीसी 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर प्रा. लि. या ट्रान्सपोर्ट फर्म मध्ये कंटेनरवर चालक म्हणून नोकरी करत होता. फिर्यादी यांनी आरोपीला कंटेनर मधून अमेझॉन कंपनीचा माल घेऊन जाण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली. त्यानुसार आरोपीने अमेझॉन कंपनीच्या बेंगलोर येथील गोडावून मधून एक कोटी 53 लाख 96 हजार 300 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रीक वस्तु, कपडे इतर वस्तु कंटेनमध्ये भरले.

आरोपी बेंगलोर येथून कंटेनर घेऊन पुण्यातील आंबेठाण येथे घेऊन येत होता.
प्रवासा दरम्यान आरोपी शाहिद याने अमेझॉन कंपनीच्या 48 लाख 69 हजार 956 रुपये किमतीच्या इलेक्ट्रीक वस्तू
काढून घेत अपहार केला. त्यानंतर आरोपीने मोबाईल बंद करून पळून गेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घाडगे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.